कोकणात ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला विरोध

32

सामना ऑनलाईन । रत्नागिरी

राजापूर तालुक्यातील नाणार येथे बसवण्यात येणाऱ्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध केला आहे. प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या १५ गावांच्या ग्रामस्थांनी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

नाणार, कुंभवडे आणि सागवे गावाच्या परिसरात १३ हजार एकरवर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. प्रकल्पामुळे साडेतीन हजार कुटुंबांना स्थलांतरित व्हावे लागणार आहे. प्रकल्पामुळे ग्रामस्थांना देशोधडीला लागावे लागेल, त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी बैठक घेत या प्रकल्पाला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या