ब्रँडेड कुंकू नसल्याचे कारण देऊन लग्न मोडले

लग्न जमल्यांनतर कुंकू लावण्याचा कार्यक्रमात ब्रँडेड कुंकू वापरले नसल्याचे कारण देऊन चक्क लग्न मोडल्याचा संतापजनक प्रकार भिवंडीत घडला आहे. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार नीरज पाटील, सुधाकर पाटील, नयना पाटील, कमलाकर पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

भिवंडी तालुक्यातील घोटगाव येथील मूळ रहिवासी असणारे सुदाम पाटील, सध्या मुक्काम वसई यांनी त्यांचा सिव्हिल इंजिनिअर असणाऱ्या मुलाचे लग्न वाडा तालुक्यातील एका3 मुलाबरोबर ठरवले होते. हे लग्न जमल्यानंतर एंगेजमेंटचा कार्यक्रम पार पडला. दुसऱ्या दिवशी लग्नाची तारीख ठरवण्यासाठी मुलीच्या वडिलांनी वर पित्याला फोन केला असता त्यांनी चक्क आपलं जमणार नसल्याचं कारण सांगितलं. यानंतर मुलीचे वडील मुलाच्या वडिलांकडे गेले असता कुणीच दाद दिली नाही. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी वाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यावेळी वाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधीर संखे4 यांनी मुलाच्या वडिलांना लग्न मोडल्याचे कारण विचारले असता टिळा लावण्याचा कार्यक्रमाच्या वेळी वापरलेले कुंकू हे ब्रँडेड नसल्याचे बालिश कारण दिले.

आपली प्रतिक्रिया द्या