मोदी सरकारला धक्का, २०१७-१८ तील जीडीपीच्या दरात घटीचा अंदाज

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

नोटाबंदी, जीएसटी असे निर्णय घेऊन झटक्यात आर्थिक प्रगती साधण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न देशाच्या मुळावर आल्याचे दिसत आहे. सरकारच्याच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (सीएसओ) २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या जीडीपी दरात घटीची शक्यता वर्तविली आहे. मोदी सरकार २०१८-१९च्या अर्थसंकल्पाच्या तयारीत गुंतले आहे. या पार्श्वभूमीवर सीएसओचा अंदाज महत्त्वाचा आहे.

सीएसओच्या अंदाजानुसार, २०१७-१८ या आर्थिक वर्षात देशांतर्गत उत्पन्न वाढीचा दर अर्थात जीडीपी ६.५ टक्के राहण्याची शक्यता आहे. याआधीच्या म्हणजे २०१६-१७ या आर्थिक वर्षात जीडीपी ७.१ टक्के होता. त्यामुळे जीडीपीतील घटीचा अंदाज हा मोदी सरकारसाठी मोठा धक्का आहे.

सरकारच्या नोटाबंदी, जीएसटी या निर्णयांमुळे औद्योगिक उत्पादन मंदावले आहे. बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे.अशा परिस्थितीत जीडीपीच्या दरात घटीचा अंदाज सीएसओने व्यक्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या