‘जीएसटी’ विधेयक अखेर राज्यसभेत मंजूर

27

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

वस्तू आणि सेवा कर, अर्थात ‘जीएसटी’ विधेयकाशी संबंधित चार विधेयके कोणत्याही दुरुस्तीविना आज राज्यसभेत मंजूर करण्यात आली. विशेष म्हणजे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या विधेयकाला ऐतिहासिक विधेयक म्हटले होते. या विधेयकाच्या मंजुरीसाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्यानेच कोणत्याही दुरुस्तीविना हे विधेयक मंजूर करण्यात आले. त्यामुळे आता देशात १ जुलैपासून जीएसटी लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सेंट्रल जीसएटी, इंटिग्रेटेड जीएसटी, युनियन जीएसटी आणि नुकसानभरपाई कायदा विधेयक ही चार विधेयके राज्यसभेत मांडण्यात आली. तृणमूल काँग्रेसचा अपवाद वगळता कोणीही या विधेयकांमध्ये दुरुस्ती सुचवली नाही. या विधेयकावर कोणतीही दुरुस्ती सुचवू नका. सहमतीने विधेयक मंजूर होऊ द्या असा सल्ला मनमोहन सिंग यांनी काँग्रेसला दिला होता. त्यामुळे काँग्रेसने विधेयकाला आडकाठी केली नाही. काँग्रेसनेही या विधेयकात कोणतीही दुरुस्ती सुचवली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या