उद्या GST Council ची बैठक, या वस्तू स्वस्त होण्याच्या शक्यता

4365

गोव्यात 20 ऑगस्ट रोजी वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत खाजगी आरोग्य क्षेत्रातील इनपूट टॅक्स क्रेडिट वर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच ऑटोमोबाईल सारख्या क्षेत्रात कर कमी होण्याचीही शक्यता आहे.

गेल्या 19 वर्षात यंदा ऑटोमोबाईल क्षेत्रात सर्वाधिक मंदी आहे. दुचाकी आणि आणि कारच्या उत्पादन आणि विक्रीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. म्हणून काही ठराविक ऑटोमोबाईल उत्पादनांवर कर कमी करण्यात यावा अशी मागणी पुढे येत आहे. 

केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आतपर्यंत बँकिंग, ऑटोमोबाईल, वित्त सेवा, परराष्ट्रीय गुंतवणूकदार, स्टील, बांधकाम व्यावसायिक सह इतर क्षेत्रातील प्रतिनिधींची भेट घेतली आहे. 

जुलै महिन्यात जीएसटी संकलनाचा आकडा एक लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जूनमध्ये हा आकडा 99 हजार 939 कोटी इतका होता. चालू आर्थिक वर्षात जीएसटी संकलन एक लाख कोटींच्या खाली आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या