जीएसटी बैठक राज्यांना 16 हजार कोटी देणार

‘वस्तू आणि सेवा कर’ म्हणजेच ‘जीएसटी’ कौन्सिलची 49 वी बैठक आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत पार पडली. यामध्ये पेन्सिल शार्पनरवर असणारा 18 टक्के ‘जीएसटी’ 12 टक्क्यांवर आणण्यात आला. त्यामुळे पेन्सिल, शार्पनर स्वस्त होणार आहे. तर राज्यांना गेल्या पाच वर्षांसाठी देय असणारी 16 हजार कोटींची ‘जीएसटी’ भरपाई देण्याचा निर्णयही झाला.

दिल्ली, तामीळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटकरसह 16,982 कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. लिक्विड जॅगरीवर असणारा 18 टक्के जीएसटी शून्यावर आणला जात असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले, मात्र पॅकबंद किंवा लेबल लावून विक्री केली जात असेल तर 5 टक्के जीएसटी भरावा लागणार आहे.