जीएसटीचा साईड इफेक्ट, तामीळनाडूतील चित्रपटगृहांनी पुकारला बंद

306

सामना ऑनलाईन । चेन्नई

तामीळनाडू फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स या संघटनेने जीएसटी लागू होताच आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. जीएसटी लागू झाला तरी तिकिटावर नेमका किती जीएसटी आकारला जाणार हे तामीळनाडू सरकारने अद्याप चित्रपटगृहांच्या मालकांना सांगितलेले नाही. तिकिटांवर जीएसटी व्यतिरिक्त इतर कोणताही कर तसेच अधिभार लागू होणार की नाही याबाबतही गोंधळाचे वातावरण आहे. तामीळनाडू सरकारकडून स्पष्ट माहिती मिळत नसल्याचा निषेध म्हणून सोमवारपासून (३ जुलै) तामीळनाडूतील तब्बल ८०० चित्रपटगृह अनिश्चित काळासाठी संप पुकारणार आहेत.

संपामुळे तामीळनाडूतील चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शन थांबणार आहे. सुमारे १० लाख कुटुंब चित्रपटांशी संबंधित व्यवसायात गुंतली आहे. चित्रपटांचे प्रदर्शन थांबल्यामुळे या सगळ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या