GST संकलनात 33 टक्क्यांनी वाढ, जुलै महिन्यात 1 लाख कोटीहून अधिक कर जमा

सेवा आणि वित्त कर संकलनात जुलै महिन्यांत 33 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जुलै महिन्यात सरकारी तिजोरीत एक लाख 16 हजार कोटी रुपयांचा कर जमा झाला आहे. तर महाराष्ट्र राज्याच्या जीएसटी संकलनात 51 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अर्थमंत्रालयाने ही माहिती दिली आहे. जुलै महिन्यातील कर संकलन वाढल्याने अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आल्याचे सांगण्यात येत आहे. जुलै 2020 मध्ये 87 हजार 422 कोटी रुपयांचा जीसटी संकलित करण्यात आला होता. गेल्या महिन्यात म्हणजेच जून 2021 मध्ये 92 हजार 849 कोटी रुपये कर जमा झाला होता.


तर राज्याच्या जीएसटी संकलनात 51 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गुजरातच्या जीएसटी संकलनात 36, बिहारच्या 21, मध्य प्रदेशच्या 16 तर उत्तर प्रदेशच्या जीएसटी संकलनात 16 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

जुलै महिन्यात जीएसटीच्या माध्यमातून एक लाख 16 हजार 393 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. त्यात केंद्र सरकारचा 22 हजार 197 कोटी तर राज्यांचा 28 हजार 541 कोटी इतका कर जमा झाला आहे. जुलै 2021 मध्ये गेल्या वर्षीच्या जुलै महिन्याच्या तुलनेत 33 टक्के अधिक कर जमा झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या