हिंदुस्थानात १ जुलैपासून जीएसटी लागू होणार

२२ डिसेंबर केंद्र सरकारकडून २५ वस्तूंवर जीएसटीत कपात

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानात १ जुलैपासून जीएसटी लागू करणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिल्लीत केली. याआधी जीएसटी १ एप्रिलपासून लागू होणार होता.

जीएसटी परिषदेच्या बैठकीत येत्या १ जुलैपासून जीएसटी लागू करण्याचा निर्णय झाला. दीड कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांच्या कराच्या मुल्यांकनाचा अधिकार राज्याला द्यावा, अशी अनेक राज्यांची मागणी होती. यावर आजच्या बैठकीत तोडगा काढण्यात आला. ९० टक्के कराचा अधिकार राज्याला असेल तर उर्वरित १० टक्के कराचा अधिकार केंद्राला असेल, असे आजच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आल्याचे जेटली यांनी सांगितले. केंद्र आणि राज्यांचे अर्थमंत्री आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात व्यस्त असल्याने जीएसटी संदर्भात पुढील बैठक १८ फेब्रवारी रोजी ठेवण्यात येणार असल्याची माहितीही जेटली यांनी यावेळी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या