Video- एटीएम लुटीचा प्रयत्न फसला, चोरांचा सुरक्षारक्षकावर गोळीबार 

41
प्रतिकात्मक
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
नवी दिल्लीतील माजरा डबास परिसरात सुरक्षारक्षकाने दाखवलेल्या हिमतीमुळे मोठा अनर्थ टळला आहे. सुरक्षारक्षकाच्या विरोधामुळे चोरांचा चोरीचा हेतू फसला आहे. मात्र चोरीचा हेतू फसल्याचं लक्षात येताच निराश चोरांनी सुरक्षारक्षकावर गोळी झाडली. हा सगळा प्रकार जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. जखमी सुरक्षारक्षकावर जवळील रुग्णालयात उपचार सुरू आहे.

नवी दिल्लीतील माजरा डबास परिसरातील स्टेट बॅंकेच्या एटीएम बाहेर दुपारी हा प्रकार घडला आहे. ज्यावेळी हा प्रकार घडला त्यावेळी एटीएममध्ये पैसे भरण्याचं काम सुरू होतं त्यामुळे एटीएमचं शटर अर्ध बंद करण्यात आलं होतं. एक सुरक्षारक्षक एटीएमच्या बाहेर तैनात होता. त्याचवेळी बाईकवरून दोन चोर एटीएमजवळ आले  आणि एटीएममध्ये घुसण्याचा प्रयत्न करू लागेल. मात्र मोठ्या हिमतीने तेथे तैनात असलेल्या सुरक्षारक्षकाने त्यांना विरोध केला. सुरक्षारक्षक चोरट्यांना हाथ जोडून विनवणी देखली करत होता. मात्र आपला चोरीचा हेतू साध्य होत नाही हे लक्षात येताच एका चोरट्याने सुरक्षारक्षकावर गोळी झाडली आणि तेथून पसार झाले.
चोर आणि सुरक्षारक्षक यांच्यातील थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. काही वेळाने घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी सुरक्षारक्षकाला रुग्णालयात दाखल केले. सुरक्षारक्षकाची प्रकृती नियंत्रणात असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून तपास सुरू केला आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या