वासंतिक नवरात्र महोत्सव – श्री काळाराम मंदिरात स्वाध्याय परिवाराच्या धनश्री दीदींच्या हस्ते उद्घाटन

प्रभु श्रीराममांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमी नाशिक मधील पंचवटी येथील श्री काळाराम मंदिरात गुढीपाडव्यानिमित्त आज, बुधवार सायंकाळी पाच वाजता वासंतिक नवरात्र महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख धनश्रीदीदी तळवलकर यांच्यासह जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी उपस्थित राहणार आहेत. गुढीपाडव्याच्या शुभमहूर्तावर दीदी उपस्थित राहणार असल्याने स्वाध्याय परिवार आणि कार्यक्रमाचे आयोजक काळाराम मंदिर ट्रस्ट यांचा उत्साह पाहायला मिळत आहे. स्वाध्याय परिवाराच्या उपस्थिती मुळे वाढणारी संख्या लक्षात घेऊन काटेकोर व्यवस्था करण्यात आली आहे. उत्सव कालावधीत सामान्यांना दर्शनासाठी अडथळा निर्माण होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात आल्याचं मंदिर ट्रस्ट कडून सांगण्यात आलं.

काळाराम मंदिराचा दक्षिण दरवाजा हा स्वाध्याय परिवारासाठी खुला ठेवण्यात येणार असून अन्य दोन दरवाजे अन्य भाविकांसाठी खुले राहणार आहे. स्वाध्याय परिवाराचे निवडक 2000 सदस्य येणार असल्याची माहिती मंदिर ट्रस्ट काढून देण्यात आली आहे. त्यांच्यासाठीची आसन पाणी आणि चप्पल काढण्यासाठी व्यवस्था स्वतःहून करणार असल्याचेही त्यांनी सांगितलं. तर पार्किंगची व्यवस्था आरपी विद्यालयात करण्यात आली आहे.