Video – परदेशातही मराठी संस्कृतीचं जतन, बेल्जियममध्ये महाराष्ट्रीयन गुढी

गुढीपाडवा… हिंदुवर्षांनुसार महाराष्ट्रात गुढीपाडव्याला नवीन वर्ष उत्साहात साजरं केलं जातं. साडेतीन मुहुर्तापैकी एक असल्यामुळे या सणाला खुप महत्व आहे. महाराष्ट्राबरोबरच देशातील काही राज्यांमध्ये हा सण उत्साहात साजरा केला जातो. विविधतेनं नटलेल्या आपल्या संस्कृतीचं दर्शन देशातचं नाही तर परदेशातही पहायला मिळालं.

दरवर्षीप्रमाणे यंदाही युरोपमधील बेल्जियम या देशात मराठी गुढ्या अभिमानाने उभारण्यात आल्या. हिंदुस्थानी दुतावास आणि बेल्जियम मराठी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल पाडवा उपक्रमांतर्गत विविध संस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी बेल्जियमचे हिंदुस्थानी दुत संतोष झा आणि अभिनेत्री अदिती सारंगधर उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवणारी होती.

गुढीपाडवा सण आनंदाचा, नववर्षाचा… विजय आणि समृद्धीचे प्रतिक असणाऱ्या गुढीची गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेला उभारणी केली जाते. संस्कृतीनुसार बांबूच्या काडीला नवीन वस्त्र गुंडाळून कडूलिंबाची डहाळी, साखरेची गाठी, फुलांचा हार आणि धातूचा गडू लावून गुढी उभारली जाते.

देवासारखीच गुढीची पुजा करून नैवेद्य दाखवला जातो. नोकरी व्यवसायनिमित्त बेल्जियममध्ये अनेक नागरिक स्थायीक झाले आहे. आपली विविधतेनं नटलेली संस्कृती कुठेही असले तरी विसरता येत नाही. प्रत्येकजन जगाच्यापाठीवर संस्कृतीचं जतन करत असतो. बेल्जिमधील मराठी कुटुंबांनीही गुढीपाडव्याच्या दिवशी गुढ्या उभारून आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीचं दर्शन परदेशात घडवलं.

गुढीपाडव्यानिमित्त हिंदुस्थानी दुतावास आणि बेल्जियम मराठी मंडळ यांच्या संयुक्तविद्यामाने करोना साथरोगाची गंभीरता लक्षात घेऊन ऑनलाईन पध्दतीने डिजिटल पाडवा उत्साहात साजरा केला. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. बेल्जियमचे भारतीय दुत संतोष झा यांनी सर्व नागरिकांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदु नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच करोना संकटात डिजिटल पाडवा उपक्रमाचे कौतुक करून काळजी घेण्याचे आवाहन केलं.

आपली प्रतिक्रिया द्या