नवरात्री उत्सवासाठी नियमावली जाहीर करा, आशीष शेलार यांचे ट्विट

नवरात्री उत्सवाला अवघे काही दिवस राहिले आहेत.त्यामुळे राज्य सरकारने देवीच्या मूर्तींची उंची व नियमावली जाहीर करावी अशी मागणी भाजपचे आमदार अॅड. आशीष शेलार यांनी ट्विटद्वारे केली आहे.

सरकारने नवरात्री उत्सवाच्या नियमावलीबाबत काही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राज्यातील हजारो मूर्तीकार चिंतेत आहेत असे ट्विटमध्ये नमूद केले आहे. यापूर्वी आशीष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून नियमावली जाहीर करण्याची विनंती केली होती. मुंबईत देवीच्या मूर्ती तयार करणारे सुमारे पाच हजार मूर्तीकार व कारखाने आहेत. या मूर्तीकारांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी नवरात्री उत्सवाच्या नियमावलीचा निर्णय वेळीच घ्या. पेणमधील दोहे, हमरापूर, केळवे या गावामध्ये गणेशमूर्तीकार व कारखाने मोठय़ा संख्येने आहेत. या गावातील मूर्तीकारांना मागील वर्षीच्या तुलनेत 20 ते 25 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. बहुसंख्य मूर्तीकार त्याच कारखान्यात पुन्हा देवीच्या मूर्ती घडवित असल्याने त्यांना सरकारने स्पष्टता देण्याची गरज आहे असे मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद
केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या