गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार, शहरात पाणीच पाणी

90

सामना ऑनलाईन। अहमदाबाद
महाराष्ट्रासह अनेक राज्यात धूमाकूळ घालणाऱ्या पावसाने गुजरातमध्ये हाहाकार उडवला आहे. बडोद्यात 14 तासात 18 इंच पावसाची नोंद झाली आहे. रस्ते व शेतजमीन पाण्याखाली गेल्या आहेत. अनेक घरांबरोबरच शॉपिंग मॉलमध्येही पाणी शिरल्याने लोकांची तारांबळ उडाली आहे. अनेक ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांना सुखरूप ठिकाणी हलवण्यासाठी रस्त्यावर मोटरबोट उतरल्या आहेत.

रस्ते पाण्याखाली गेल्याने अनेक ठिकाणी वाहने रस्त्यात अडकली आहेत. यामुळे सगळीकडे वाहतूककोंडी झाली असून काहीजणांनी वाहनं रस्त्यावरच सोडून पायी जाण्याचा मार्ग अवलंबला आहे. खासगी व सरकारी शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. संपूर्ण शहराला तळ्याचे स्वरूप आले आहे. पावसाचा परिणाम रेल्वे व विमान सेवेवरही झाला आहे. रेल्वे रुळांबरोबरच विमानतळावरही पाणी भरल्याने अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या व विमानांची उडाण्णे रद्द करण्यात आली आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या