गुजरात : राजकोटमध्ये पाण्यात बस अडकली, प्रवाशांचा जीव टांगणीला

707
gujrat-bus-water-logging

देशभरात कोरोनाचा कहर सुरू आहे, अशातच उशिरा पण जोरदार बरसणाऱ्या पावसाने देशातील अनेक भागात जनविस्कळीत केल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. गुजरातच्या राजकोटमध्ये देखील काही भागात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याचे चित्र पाहायला मिळाले. गोंडल भागात तर पुलाखाली तुंबलेल्या पाण्यात गुजरात राज्य परिवहन मंडळाची एक बस अडकली. इंजिनमध्ये पाणी गेल्याने बस बंद पडली होती. प्रवासी आणि बस चालक मध्येच अडकून पडल्याने साऱ्यांचाच जीव टांगणीला लागलेला. अखेर जेसीबी आणि स्थानिकांच्या मदतीने बस खेचून बाहेर काढण्यात आली आणि त्यानंतर साऱ्यांचा जीव भांड्यात पडला.

आपली प्रतिक्रिया द्या