पतीने दिल्लीवरून आणल्या दोन गर्लफ्रेंड, पत्नीने आक्षेप घेतल्यावर दिला तिहेरी तलाक

triple-talaq

पतीने दिल्लीवरून दोन बायकांना सोबत आणले व त्यांच्या सोबत अनैतिक संबंध ठेवले म्हणून आक्षेप घेणाऱ्या पत्नीला पतीने तिहेरी तलाक दिल्याची घटना गुजरातमधील अहमदाबाद येथे घडली आहे. या प्रकरणी महिलेने पतीविरूद्ध तिहेरी तलाक दिल्याची तक्रार दाखल केली आहे. या महिलेचा असा आरोप आहे की तिच्या नवऱ्याच्या दोन प्रेयसी आहेत आणि त्याच गोष्टीमुळे त्याने घटस्फोट घेतला आहे.

जुहापुरा येथे राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून वेजलपूर पोलिसांनी आरोपी पतीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही महिला म्हणाली की तिचा नवरा महिन्याभरापूर्वी दिल्लीला गेला होता. जेव्हा तो दिल्लीहून परत आला तेव्हा तो आपल्याबरोबर दोन महिला घेऊन आला. त्या महिला त्याच्या प्रेयसी असल्याचा दावा त्याने केला आहे. त्याने त्या प्रेयसींसाठी फतेवाडी येथे फ्लॅट भाड्याने घेऊन तिथेच राहण्याची सोय केली. महिलेने आक्षेप घेतल्यावर आरोपीने तिला घराबाहेर काढले.

दहा वर्षापूर्वी सदर महिलेचे फतेहवाडी परिसरातील एका व्यक्तीशी लग्न झाले होते. तिच्या नवऱ्याचे लॉन्ड्रीचे दुकान आहे. तो तिला रोज मारहाण करायचा. छोट्या छोट्या गोष्टींबद्दल तिला टोमणे मारत असे. 2016 मध्ये तिने त्याच्यावर घरगुती हिंसाचारात तक्रार दाखल केली होती. परंतु कुटुंब आणि नातेवाईकांच्या दबावामुळे तिने ही तक्रार मागे घेतली. या महिलेने सांगितले की तिला 9 आणि 8 वर्षाच्या मुली आहेत. तक्रार मागे घेतल्यानंतर तिच्या नवऱ्याच्या वागण्यात पुन्हा बदल झाला. तो रात्री उशिरा घरी येत असे. तर कधीकधी घरीच येत नसे. तिने विचारल्यावर तो तिला मारहाण करत असे, असे तिने तक्रारीत सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या