मोदींची जादू भुर्र, गुजरातमध्ये पुन्हा रिकाम्या खुर्च्यांपुढे भाषण

43

सामना ऑनलाईन । भरूच

गुजरात निवडणुकीचा दिवस जसा जवळ येत आहे तसा प्रत्येक पक्ष मतदरांना आकर्षित करण्यासाठी सर्वोतोपरी जोर लावताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये भरगच्च मतांनी झोळी भरणाऱ्या भाजपची गुजरात निवडणुकीत मात्र दमछाक होताना दिसत आहे. पंतप्रधान मोदी आणि अनेक मंत्र्यांचा ताफा गुजरातमध्ये रोज सभा घेत आहे. रविवारी पंतप्रधानांनी भरूचमध्ये एक सभा घेतली. या सभेमध्ये मोदींची जादू ओसरत चालल्याचे चित्र दिसून आले. जसदणमध्ये झालेल्या सभेप्रमाणे भरूचमध्येही मोदींवर रिकाम्या खुर्च्यांपुढे भाषण करण्याची वेळ आली. या सभेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

उत्साहावर विरजण, मोदींचे रिकाम्या खुर्च्यांसमोर भाषण

हा व्हिडिओ जैनेद्र कुमार नावाच्या एका ट्विटर युझरने शेअर केला आहे. व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीने म्हटले आहे की, ‘पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाच्यावेळी तब्बल ७० टक्के खुर्च्या रिकाम्या होत्या. गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये १५० जागा जिंकण्याचा मनसुबा ठेवणाऱ्या भाजपसाठी रिकाम्या खुर्च्यांचे सत्र चिंतेचा विषय आहे. कारण पंतप्रधान मोदींच्या सभेमध्ये गर्दी नाहीच परंतु खुर्च्याही रिकाम्या दिसत आहेत. मोदींच्या समोरील खुर्च्या रिकाम्या दिसत आहेत. पंतप्रधान मोदी यांचे भाषण सुरू असताना जवजवळ ३/४ खुर्च्या रिकाम्या दिसत आहेत. तसेच काही लोक भाषण सुरू असताना निघून जात आहेत.’ नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ म्हणजे मोदींची जादू ओसरत असल्याचा पुरावा असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी हा व्हिडिओ फेक असल्याचे म्हटले आहे.

याआधी २७ नोव्हेंबरला जसदणमध्ये आयोजित पंतप्रधान मोदी यांच्या सभेला स्थानिक जनतेने पाठ फिरवल्याचं दिसून आले होते. त्यामुळे मोदी यांना तब्बल ८०० रिकाम्या खुर्च्यांसमोर भाषण करायची वेळ आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या