गुजरात विधानसभा निवडणूक; १२ वाजेपर्यंत ३१ टक्के मतदान

32

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

गुजरात विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याच्या मतदानला सुरुवात झाली आहे. येथे विधानसभेच्या एकूण जागा १८२ असून त्यातील ८९ जागांवर मतदान होणार आहे. त्या जागा सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधील आहेत.

पहिला टप्प्यातील मतदानात मुख्यमंत्री विजय रूपानी, काँग्रेस नेते शक्तिसिंह गोहिल, परेश धनानी यांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद होणार आहे. एकूण ९७७ उमेदवार रिंगणात उतरले असून त्यात ५७ महिला उमेदवारांचा समावेश आहे.

गुजरातमध्ये गेली तब्बल २२ वर्षे भाजप सत्तेवर असून यावेळी सत्ता राखणे भाजपला कठीण असल्याचे चित्र दिसून आले आहे. त्यामुळे भाजपने पहिल्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १४ प्रचार सभा घेतल्या. तसेच अनेक केंद्रीय मंत्र्यांसहित इतर राज्यांतील भाजपच्या मुख्यमंत्र्यांनाही गुजरातमध्ये आणून त्या पक्षाने सारी शक्ती पणाला लावली आहे.

पटेल, दलित ओबीसींमुळे भाजपपुढे आव्हान
गुजरातच्या या निवडणुकीत यावेळी आरक्षणाच्या मुद्दय़ावरून पटेल समाज, दलित आणि ओबीसी हे भाजपच्या पूर्णपणे विरोधात उभे ठाकले आहेत. हार्दिक पटेल यांनी भाजपला सत्तेतून हद्दपार करण्याचा निर्धार केला आहे. त्यांच्यासोबत दलित नेते जिग्नेश मेवानी ओबीसी नेते अल्पेश ठाकूर हे काँग्रेसच्या पाठीशी आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या