भाजप कार्यकर्तीच्या घरात जुगाराचा अड्डा, पोलिसांनी केली अटक

1297

गुजरातमधील गांधीनगर येथे जुगाराचा अड्डा चालवल्याप्रकरणी पोलिसांनी भाजपच्या एका महिला कार्यकर्तीसह सहा जणांना अटक केली आहे.  हिना बेन पटेल असे त्या भाजप कार्यकर्तीचे नाव असून तिच्याच बंगल्यात हा जुगाराचा अड्डा सुरू होता. पोलिसांनी घटनास्थळावरून 51 हजाराची कॅश व चार मोबाईल फोन, कार आणि प्लास्टिकचे कॉईन जप्त केले आहेत.

हिनाबेन पटेल (45) हिचा गांधीनगर मधील सरगासन येथे शांतीविला बंगला आहे. तिच्या या बंगल्यात तिने जुगाराचा अड्डा सुरू केला होता. हिना बेन स्वत:च्या कमाईसाठी लोकांना जुगार खेळायला तिच्या बंगल्यावर बोलवायची. त्याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी बंगल्यावर छापा मारला. त्यावेळी हिनाबेन पटेल, जगदीश पटेल, वावोल टांक, अंकित बाबाभाई पटेल, कृणाल पटेल आणि सरफराज इस्मालीभाई फकिर यांना अटक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या