कुकरमध्ये अडकलं चिमुकलीचं डोकं, काढताना डॉक्टरही झाले हैराण

घरातल्यांसोबत लपाछपी खेळताना स्वत:ला लपविण्यासाठी डोकं कुकरमध्ये घालणं एका चिमुरडीला खुपच महागात पडलं. या चिमुकलीचं डोकंच कुकरमध्ये अडकल्याने एक मोठा गोंधळ उडाला. डॉक्टरांना देखील तिच्या डोक्यातून तो कुकर काढता आला नाही. शेवटी एका धातू कापणाऱ्याला बोलावून तो कुकर कापून तिच्या डोक्यातून काढण्यात आला.

गुजरातमधील भावनगरमधील पिरछिल्ला येथे राहणाऱी दोन वर्षांची प्रियांशी तिच्या कुटुंबीयांसोबत लपाछपी खेळत होती. त्यावेळी लपण्याआधी तिने एका कुकरमध्ये तिचे डोके घुसवले. मात्र नंतर डोक्याच्या भागातून कुकर निघतच नव्हता. त्यामुळे प्रियांशी रडू लागली. तिचे रडणे ऐकून धावत आलेल्या कुटुंबीयांनी देखील डोके कुकरमधून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनाही ते शक्य झालं नाही. त्यामुळे मग प्रियांशीला रुग्णालयात नेण्यात आले. तिथेही डॉक्टरांनी बरेच प्रयत्न केले. मात्र त्यांनाही तिचे कुकरमधून डोकं बाहेर काढण्यात अपयश आलं. त्यानंतर अखेर एका धातू कापणाऱ्याला बोलावण्यात आले. त्याने बरीच काळजी घेत प्रियांशीच्या डोक्यात अडकलेला कुकर कापून काढला व तिला मुक्त केले. त्यानंतर प्रियांशीला घरी पाठविण्यात आले. मात्र लवकरच प्रियांशीच्या डोक्याची तपासणी करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या