गुजरातमध्ये हजारो मजूरांचे रस्त्यावर उतरून आंदोलन, 60 जणांना अटक

1686

गुजरातमधील सुरत मध्ये पुन्हा एकदा परप्रांतीय मजूर रस्त्यावर उतरले असून यावेळेस त्यांनी घरी जाण्यासाठी आंदोलन केले आहे. सुरतमध्ये शनिवारी सकाळी आठच्या सुमारास तब्बस हजारो मजूर सरकारविरोधात आंदोलन करत होते. या आंदोनलातील 60 मजूरांना पोलिसांनी अटक केली आहे.

सुरतमधील हाझीरा औद्योगिक क्षेत्रात परराज्यातून आलेले हजारो मजूर काम करतात. लॉकडाऊनमुळे सध्या सर्व कामकाज ठप्प असल्याने या मजूरांना त्यांच्या घरी परतायचे आहे. त्यामुळे या मजूरांनी रस्त्यावर येत आंदोलन केले. एकावेळी एवढे मजूर रस्त्यावर उतरल्याने मोठा गोंधळ उडाला. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी मजूरांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली व त्यानंतर मजूर तेथून जाऊ लागले.

मजुरांकडून तीनपट पैसे उकळले, विरोध केल्याने बेदम मारहाण; गुजरातमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा प्रताप

या आठवड्याच्या सुरुवातीला सुरतमध्ये परप्रांतीय मजूरांनी घरी जाण्यासाठी आक्रमक होत पोलिसांवर दगडफेक केली होती. त्यानंतर त्या जमावाला रोखण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या होत्या. तसेच शुक्रवारी गुजरातमध्ये स्थलांतरित मजुरांकडून घरी परतण्यासाठी तीन पट पैसे उकळले जात असल्याचे समोर आले होते. याला विरोध केल्याने भाजप कार्यकर्त्यांनी मजुरांना बेदम मारहाण केल्याचा गंभीर प्रकार समोर आलेला. सुरतमधील हा प्रकार असून गुजरात काँग्रेसने याचा पर्दाफाश केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या