महिला पोलिसाशी गैरवर्तन, गुजरातमध्ये भाजप मंत्र्याच्या मुलाला अटक

1966

गुजरात सरकारमधील राज्यमंत्री कुमार कनानी यांचा सुपुत्र आणि त्याच्या दोन मित्रांना पोलिसांनी अटक केली. कर्फ्युचे उल्लंघन आणि महिला पोलिसाशी गैरवर्तन केल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. ‘नवभारत टाइम्स’ने याबाबत वृत्त दिले आहे.

गुजरातचे आरोग्य राज्यमंत्री आणि वराछा रोड मतदारसंघाचे आमदार कुमार कनानी यांचा मुलगा प्रकाश कनानी आणि त्यांच्या मित्रांनी कर्फ्युमध्ये रोखले म्हणून महिला पोलिसाशी गैरवर्तन केले. महिला पोलीस सुनीता यादव यांच्यासोबत त्यांनी गैरवर्तन केले. याचा व्हिडीओ शनिवारी व्हायरल झाला. यानंतर रविवारी पोलिसांनी राज्यमंत्री कनानी यांच्या मुलासह मित्रांना अटक केली.

ए-डिव्हिजनचे सहाय्यक पोलीस आयुक्त सी.के.पाटील यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, प्रकाश कनानी आणि त्यांच्या मित्रावर कलम 188, 269, 270 आणि 144 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दोघांना अटक करण्यात आली. यानंतर त्यांची जामिनावर मुक्तता देखील करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या