
पंचायत निवडणुकीत एका उमेदवाराला केवळ एक मत मिळाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांनीही त्यांना मतदान केले नाही. त्यांच्या घरात 12 सदस्य होते. निवडणूक निकालाची माहिती लोकांना समजताच या उमेदवाराची चर्चा सुरू झाली. प्रकरण गुजरातमधील वापी जिल्ह्यातील आहे. टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, वापी जिल्ह्यातील छारावळा येथील सरपंचपदासाठी उमेदवार संतोष हलपती यांनी अर्ज दाखल केला होता.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, मतमोजणी केंद्रावर निकाल लागला तेव्हा हलपती हैराण झाले. जेव्हा कळले की त्यांच्या कुटुंबातील कोणीही त्यांना मतदान केले नाही. किमान त्यांच्या पत्नीसह त्यांचे कुटुंबीय त्यांच्या बाजूने मतदान करतील, अशी अपेक्षा त्यांना होती.
स्थानिक निवडणुकांमधील निकालांवर ते नाराज नसल्याचे हलपती यांनी सांगितले. परंतु 12 जणांच्या कुटुंबातील एकाही सदस्याने त्यांना मतदान केले नाही हे जाणून अतिशय दुःख झाले. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी रात्रीपर्यंत गुजरातमधील 8,686 ग्रामपंचायतींपैकी 6,481 ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर केले. दोन दिवसांपूर्वी निवडणुका झाल्या. पंचायत निवडणुकीत उमेदवार पक्षाच्या तिकिटावर नव्हे तर स्वतंत्रपणे उभे राहतात. येथे लोक आपल्या मताने सरपंच आणि पंचायत सदस्य निवडतात.