गुजरातमधील गॅस कारखान्यात भीषण स्फोट, मृतांचा आकडा सहावर

405

गुजरातमधील गॅस कारखान्यामध्ये शनिवारी भीषण स्फोट झाला असून यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. स्फोटात 12 पेक्षा जास्त गंभीर जखमी झाले असून जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. वडोदरा जिल्ह्यातील पादरा तालुक्यात हा भीषण अपघात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वडोदरा जिल्ह्यातील पादरा तालुक्यात गवासद गावामध्ये एक ऑक्सिजन प्लान्ट आहे. या प्लान्टमध्ये शनिवारी सकाळी भीषण स्फोट झाला. स्फोटामुळे लागलेल्या आगीमध्ये होरपळून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. आगीची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आहे. आतापर्यंत 12 जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या