मोदीजी, ‘भाषण’ हेच तुमचे ‘शासन’ आहे काय?: राहुल गांधी

48

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ भाषणंच करत आहेत. विकासावर बोलत नाहीत. मोदींचे ‘भाषण’ हेच ‘शासन’ आहे काय?, असा खोचक सवाल राहुल गांधी यांनी आज मोदींना केला.

कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल यांनी टि्वट करून मोदी सरकारवर टीका केली आहे. मोदी यांच्या भाषणातून विकासाचे मुद्दे गायब आहेत. मी गुजरात रिपोर्ट कार्डवरून रोजगार, शिक्षण, महिला सुरक्षा आणि रोजगार आदी मुद्द्यांवरून १० प्रश्न मोदी यांना विचारले होते. त्याचेही उत्तर दिले गेले नाही. आता तर पहिल्या टप्प्याचा प्रचारही संपला तरीही त्यांचा निवडणूक जाहीरनामा आलेला नाही. म्हणजे यावेळी ‘भाषण’ हेच ‘शासन’ असणार आहे का?, असा सवाल राहुल यांनी केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या