भाजपच्या पहिल्या यादीत १७ पटेल, ७० उमेदवार जाहीर

33

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

पटेल समाजात असलेल्या नाराजीमुळे भाजपला गुजरात विधानसभा निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे हादरलेल्या भाजपने आज ७० उमेदवारांची यादी जाहीर करताना पटेल समाजातील १७ जणांना उमेदवारी दिली आहे. पटेल समाजाची नाराजी दूर करण्याचा हा भाजपचा प्रयत्न सुरू आहे.

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे गुजरात दौरे, सभा-बैठकांचा सपाटा, पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल यांच्याबरोबर आघाडी करण्याचा प्रयत्न या घडामोडींमुळे भाजपला विधानसभा निवडणुकीत फटका बसू शकतो. त्यामुळे आज ७० उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून भाजपने पटेल समाजातील १७ लोकांना उमेदवारी दिली आहे. गुजरात विधानसभेच्या १८२ जागांसाठी ९ आणि १४ डिसेंबरला मतदान होणार आहे. निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे.

पहिल्या यादीत मुख्यमंत्री विजय रूपानी हे राजकोट-पश्चिममधून तर उपमुख्यमंत्री नितीन पटेल हे मेहसाणा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गाव असलेल्या जामनगर ग्रामीणमधून राघवजी पटेल, जामनगर-उत्तरमधून धर्मेंद्रसिंह जाडेजा यांना उमेदवारी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या