अमिताभ आणि आयुष्मानची धमाल जुगलबंदी! पाहा ‘गुलाबो सिताबो’चा ट्रेलर

अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना या दोघांच्या अभिनयाची जुगलबंदी असलेला गुलाबो सिताबो या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरवरून अमिताभ आणि आयुष्मान या दोघांची धमाल जुगलबंदी पाहायला मिळेल असा अंदाज आहे.

एका घरात राहणारे दोन जण. एक मालक आणि एक भाडेकरू, अशा संहितेची ही गोष्ट आहे. घराचा वाद कोर्टात जातो आणि मग काय होतं, ते या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. उत्तर हिंदुस्थानी पार्श्वभूमी असलेला कथेचा बाज आहे.  त्यामुळे तसे त्यांचे लूक, संवाद आणि एकूणच व्यक्तिरेखा रंगवण्यात आल्या आहेत. या चित्रपटाला शूजीत सरकारने दिग्दर्शित केलं आहे.  येत्या 12 जून रोजी अॅमेझॉन प्राईम अर्थात ओटीट प्लॅटफॉर्मवर गुलाबो सिताबो प्रदर्शित होत आहे.

पाहा ट्रेलर-

आपली प्रतिक्रिया द्या