काहीतरी अघटित घडतेय, पण सरकार लपवतेय – आझाद

607

जम्मू-कश्मीरमध्ये काहीतरी अघटित घडतेय. मात्र सरकार त्या गंभीर गोष्टी आमच्यापासून लपवतेय. सत्य बाहेर पडू नये म्हणून मीडियालाही अटकाव केला जातोय, अशी टीका राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी गुरुवारी केली.

जम्मू-कश्मीरमधील कलम-370 हटवण्याच्या निर्णयावर गुलाम नबी आझाद यांनी संताप व्यक्त केला. ही लोकशाही नाही हे आपण समजू शकलो नाही तर मग आपण मूर्खांच्या स्वर्गात राहत आहोत, असे विधान करतानाच आझाद यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा उल्लेख केला. वाजयेपी पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर असताना अशा गोष्टी घडत नव्हत्या, असे ते म्हणाले. तत्पूर्वी माकप नेते सीताराम येचुरी यांनी जम्मू-कश्मीरचा निर्णय हा संविधानाच्या सर्व स्तंभावर केलेला थेट हल्ला असल्याचे म्हटले.

आपली प्रतिक्रिया द्या