धक्कादायक! यूट्यूब बघून त्यांनी बनवल्या बंदुका

627
प्रातिनिधिक फोटो

मुंबईच्या वेशीवर शस्त्रास्त्र बनविण्याचा कारखाना नवी मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केल्यानंतर आता अनेक धक्कादायक माहिती समोर येत असून त्याचे धागेदोरे रागयडच्या पोलादपूरपर्यंत पसरल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी अटक असलेले आरोपी हे कर्जत, खालापूर, पोलादपूरचे रहिवासी असून त्यांनी यूटय़ुबवर बंदुका बनविण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे तपासात उघड झाले आहे. इतकेच नव्हे तर मूळचा पोलादपूरचा रहिवासी असलेल्या एका आरोपीने तालुक्यात अनेकांना शिकारीसाठी बंदुका विकल्या आहेत.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दानफाटा येथे धाड टाकून गुन्हे शाखेने बंदुका बनविणारा कारखाना उद्ध्वस्त केला होता. याप्रकरणी पोलिसांनी व्यवसायाने सुतार असलेल्या परशुराम पिरवड (40) व दत्ताराम पंडित (52) या दोघांच्या मुसक्या आवळल्या. तपासात परशुराम पिरवड हा खालापूर तालुक्यातील नानिवली गावचा आहे, तर दत्ताराम पंडित हा कर्जत तालुक्यातील खरवंडी गावचा रहिवासी असून तो मूळचा पोलादपूर तालुक्यातील करंजे गावचा आहे. गोविंद सोनार तथा पंडित यांच्या तीन मुलांपैकी हा मुलगा असून त्याने तालुक्यात काही जणांना बंदुका विकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वस्तू विकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

– परशुराम व दत्ताराम या दोघांची ओळख व्यवसायाच्या निमित्ताने झाली होती. जास्त पैसे मिळण्याच्या लालसेपोटी दोघांनी तीन वर्षांपूर्वी चक्क यूटय़ुबवरून रायफल बनविण्याची माहिती मिळविली. यानंतर परशुराम याच्या शेतात बेकायदेशीरपणे रायफल बनविण्यास सुरुवात केली. कुर्ला, कर्जत, खोपोली आणि चौक या परिसरातून त्यांनी बंदुकीसाठी आकश्यक असणारे साहित्य खरेदी केले. यानंतर त्यांनी कर्जत आणि पनवेल या ठिकाणी 15 ते 30 हजार रुपयांना या बंदुका विकल्या.

– पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागात बार उडवून शिकारीचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी त्यांच्याकडे शस्त्र कोठून येतात याचा शोध लावण्यास स्थानिक पोलीस हतबल झाले असताना बेकायदा बंदुकीचे धागेदोरे तालुक्यापर्यंत पोहोचल्याने खळबळ उडाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या