‘गुंजन सक्सेना’ सिनेमातील दृश्यांना हवाई दलाचा आक्षेप

अभिनेत्री जान्हवी कपूरचा ‘गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल ’ हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. कारगिल युध्दात पराक्रम गाजवणाऱया फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना यांच्या आयुष्यावर हा सिनेमा आहे. करण जोहरची निर्मिती असलेला हा सिनेमा भोवऱयात सापडला असून त्यातील काही दृश्यांकर हवाई दलाने आक्षेप नोंदवला आहे. सिनेमात हवाई दलाची प्रतिमा खराब करण्यात आली असून अशी दृश्ये वगळण्यात यावीत, असे पत्र हवाई दलाने सेन्सॉर बोर्ड तसेच धर्मा प्रोडक्शन कंपनी आणि नेटफ्लिक्सला पाठवले आहे.

’गुंजन सक्सेना-द कारगिल गर्ल’ सिनेमात हिंदुस्थानच्या हवाई दलाची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आली आहेत. चित्रपटातील मुख्य पात्राचे म्हणजेच फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना यांचे महत्त्व वाढवून दाखवण्यासाठी धर्मा प्रोडक्शनने काही घटना चुकीच्या पद्धतीने दाखवल्या आहेत. हवाई दलामध्ये महिलांना देण्यात येणाऱया वागणुकीबद्दल चुकीचा संदेश या माध्यमातून दिला जात आहे, असे हवाई दलाच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

गुंजन सक्सेना यांचे 1999 सालच्या कारगिल युद्धात गुंजन योगदान आहे. त्या हवाई दलातील पहिल्या महिला चॉपर पायलट होत्या. त्यांनी जिवाची पर्वा न करता आपल्या साथीदारांचे प्राण वाचवले होते. युद्धात पाकिस्तानी लष्कराकडून हिंदुस्थानी जवानांवर निशाणा साधण्यात येत होता. त्या भागातूनच गुंजन यांनी लढाऊ विमान उडवत सैन्यदलातील जवानांना सुरक्षितरित्या बाहेर काढले होतं. गुंजन यांना त्यांच्या शौर्यासाठी सूर्यवीर पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यांची शौर्यगाथा या सिनेमातून उलगडली जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या