विरोधात बातमी छापली म्हणून वृत्तपत्राच्या कार्यालयावर गोळीबार, पाच ठार

सामना ऑनलाईन । मेरीलँड

अमेरिकेतील कॅपिटल गॅझेट या वृत्तपत्राच्या मेरिलँड येथील कार्यालयावर एका माथेफिरूने अंदाधुंद गोळीबार केला असून या गोळीबारात चार पत्रकार व एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. आपली बदनामी करणारं वृत्त छापून आल्याचा राग मनात ठेवत या व्यक्तीने गोळीबार केल्याचे समजते. या गोळीबारात अनेक जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी जॅरोड वॉरेन रामोस (३०) याला अटक केली आहे. रामोस याने सर्वप्रथम कार्यालयाच्या दरवाज्याच्या बाहेरून गोळीबार केला व त्यानंतर कार्यालात घुसून अंदाधुंद गोळीबर केला.

२०१२ साली थॉमस हार्टले या पत्रकाराने रामोस याचा एका महिलेसोबतचा फेसबुकवरील संवाद वृत्तपत्रात छापला होता. त्याावरून रामोस प्रचंड संतापला होता. त्यानंतर त्याने कॅपिटल गॅझेट व हार्टले विरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. याचवेळी रामोसने हार्टले हिला आक्षेपार्ह भाषेत धमकी देणाऱे इमेल पाठवले होते. तसेच हार्टलेला जिवे मारण्याची देखील धमकी दिली होती. या प्रकरणी हार्टलेने रामोसविरोधात खटला दाखल केला या प्रकरणात रामोसला दोषी ठरविण्यात आले होते, त्याचवेळेस न्यायालयाने रामोसने दाखल केलेला अब्रुनुकसानीचा दावा देखील फेटाळून लावला होता. हा खटला सुरु असतानाचा जॅरोड डब्ल्यू रामोस नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून कॅपिटल गॅझेट, हार्टले तसेच मेरिलँड न्यायालयाच्या न्यायधीशांवर टीका व्हायची. याप्रकरणी रामोसला काही वर्षांची शिक्षा देखील झाली होती. २०१७ साली तो शिक्षा भोगून बाहेर आला होता.

आपली प्रतिक्रिया द्या