गुरुदत्त कारखान्याचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांना ‘अचिव्हर्स ऑफ द महाराष्ट्र’ पुरस्कार

640

महाराष्ट्राच्या साखर उद्योगातील प्रगतीत टाकळीवाडी (ता. शिरोळ) येथील श्री गुरुदत्त शुगर्स लि. कारखान्याच्या माध्यमातून विकासात्मक योगदानाबद्दल कारखान्याचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते ‘अचिव्हर्स ऑफ द महाराष्ट्र’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबई येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी अभिनेता श्रेयस तळपदे उपस्थित होते.

गुरुदत्त कारखान्याने 15 हंगाम यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. देशात सलग 5 वर्षे सरासरी साखर उत्तार्‍यात प्रथम क्रमांक मिळवला व नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कारखानदारीला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न केला. उसाला कायम उच्चांकी दर दिला. ऊसविकास योजनेतून उत्पादन वाढीकडे लक्ष दिले. महापुरात कारखान्याने बारा दिवस चार हजार लोकांना व एक हजार जनावरांना आश्रय दिला. तालुक्यातील सर्वच गावात पशुवैद्यकीय शिबिरांद्वारे वीस हजार जनावरांची मोफत तपासणी व औषधोपचार केले. या कार्याची दखल घेऊन माधवराव घाटगे यांना हा पुरस्कार देण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या