बीड जिल्ह्यात तब्बल 40 कोटी रुपयांची गुटखा तस्करी उघड, पोलिसांची जबरदस्त कामगिरी

6224
प्रातिनिधिक फोटो

संचारबंदी, जमावबंदी लागू असतानाही व्यसनाधीन लोकांची व्यसने पूर्ण करण्यासाठी आणि मोठा नफा कमावण्यासाठी तस्कर सध्या अनेक ठिकाणी प्रयत्न करत आहेत. बीड जिल्ह्यातही यासाठी प्रयत्न सुरू होते, मात्र सतर्क असलेल्या पोलिसांनी तस्करांच्या या प्रयत्नांना सुरुंग लावला आहे. बीड जिल्ह्यातील पेठ बीड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी 40 कोटी रुपयांच्या गुटखा तस्करीचा भंडाफोड केला आहे.

या गुटख्याच्या विक्रीसाठी काही कुपन असतात. पोलिसांना या तस्करीचा माग घेत असताना पेठ शहरातील गांधीनगर भागामध्ये असलेल्या भंगार आणि जुन्या टायरच्या दुकानात 40 कोटी रुपयांची कुपन्स लपवून ठेवल्याची माहिती मिळाली होती. खबऱ्याकडून मिळालेल्या या माहितीच्या आधारे पोलिसांनी या दुकानावर धाड टाकली. तिथे त्यांना खरोखर ही कुपन मिळाली आहेत. या कारवाईमुळे गुटखा तस्कर अजूनही कार्यरत असल्याचं दिसून आलं आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे या तस्करांना जबरदस्त हादरा बसला आहे. अपर पोलीस अधीक्षक विजय कवाडे, उप अधीक्षक भास्कर सावंत हे स्वत: पेठ बीड पोलीस ठाण्यात तळ ठोकून आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या