बंदी असतानाही गुटख्याची खुलेआम विक्री सुरूच; प्रशासनाचे दुर्लक्ष

1017
प्रातिनिधिक फोटो

राज्यात बंदी असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची परळी शहरात खुलेआम विक्री होत असल्याचे दिसत आहे. गुटखा माफियांनी अक्षरशः परळीसह परिसरात थैमानच घातला आहे. आंध्रप्रदेश, तेलंगणा,कर्नाटक या राज्यातुन शहरामध्ये अवैधरित्या गुटख्याची आयात होत आहे, तरी देखील अन्न व औषध प्रशासन यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करत नसल्याचे दिसून येत आहे,स्थनिक पोलीस प्रशासन याकडे डोळेझाक करत असल्याचे दिसत आहे.

तंबाखूजन्य पुड्यांची खुलेआम होत असलेली विक्री युवकांना कर्करोगाच्या हवाली करत आहे तर काही ठिकाणी अल्पवयीन मुलांनाही याची सर्रास विक्री केली जात आहे. तीन महिन्याआधी रजनीगंधा, पानपराग, गोवा, राजनिवास यासह अनेक कंपनीचा गुटका डिवायसपी पथकाने पकडला होता. ही कारवाई होऊनही पुन्हा परळी परिसरात गुटखा माफिया सक्रीय झालेले आहेत. शहरात गुटखा माफीया नवनवीन मुलांना माल विक्रीसाठी देऊन टपरी चालकांपर्यंत पोचवत आहेत.

शहरात तीन पोलीस ठाणे असतानाही गुटखाविक्रीचा खेळ सुरूच आहे. पोलीस प्रशासनाने परिसरात पुन्हा पहिल्यासारखी कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रत्येकवेळी बाहेरील पथक येऊन अवैध धंद्यावर जर कारवाई करत असेल तर शहरातील पोलीस अधिकारी व कर्मचारी करतात तरी काय असा प्रश्न सर्वांना पडला आहे. शहरातील कोणत्याही भागात विक्री होणाऱ्या गुटखा विक्रीला जर प्रशासन आळा घालू शकतं नसेल तर इतर कायदा व सुव्यवस्था याबद्दल उपाय योजनेची काय अपेक्षा करावी असे जनतेतुन बोलले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या