GVK समूहाचे अध्यक्ष आणि त्यांच्या मुलावर गुन्हा, 705 कोटींच्या हेराफेरीचा आरोप

1114

जीव्हीके समूहाचे अध्यक्ष जी वेंकट कृष्णा (जीव्हीके) रेड्डी आणि त्यांचा मुलगा जीव्ही संजय रेड्डी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सीबीआयने या दोघांविरूद्ध 705 कोटी रुपयांच्या हेराफेरी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय विमानतळ प्राधिकरणातील काही अधिकाऱ्यांविरूद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जीव्हीके एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड, हिंदुस्थानच्या विमानतळ प्राधिकरण (एएआय) आणि काही परदेशी कंपन्यांनी संयुक्तपणे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (एमआयएएल) नावाची कंपनी तयार केली. 4 एप्रिल 2006 रोजी एएआयने एमआयएएल बरोबर एमआयएएल बरोबर मुंबई विमानतळाचे आधुनिकीकरण, देखभाल आणि संचालन करारावर करार केला.

सन 2012 ते 2018 दरम्यान मुंबई विमानतळ विकासाच्या नावाखाली सरप्लस फंडाच्या पैशाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. जीव्हीके समूहाने एमआयएएलच्या अतिरिक्त फंडातून अन्य कंपन्यांमध्ये 395 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. इतकेच नव्हे तर एमआयएएल मुंबईत असूनही त्याच्या अतिरिक्त निधीचे पैसे हैदराबाद बँकांमध्ये ठेवले होते.

सीबीआयनेही असा आरोप केला आहे की जीव्हीके समूहाने मुख्य कंपनी आणि समूहातील गट कंपन्यांच्या कर्मचार्‍यांचे पेमेंट दाखवून एमआयएएलच्या खर्चाच्या आकडेवारीत वाढ केली आणि त्यामुळे एएआयचे महसुली नुकसान झाले.

आपली प्रतिक्रिया द्या