तरुणाकडे मित्राने केला बायको बनवण्याचा हट्ट, तरुणाने गेमच केला

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये सिरोल इथल्या छत्रपाल नावाच्या मिठाई व्यापाऱ्याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी एक खळबळजनक माहिती उजेडात आणली आहे. छत्रपाल याचे त्याच्या मित्रासोबत समलिंगी संबंध होते. या संबंधातूनच त्याची हत्या करण्यात आली. 5ऑगस्ट रोजी छत्रपाल याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या या गोळीबारात छत्रपालचा मृत्यू झाला होता. छत्रपाल याला त्याचा मित्र यदुनाथ सिंह याने ठार मारल्याचा पोलिसांना संशय होता जो खरा ठरला.

छत्रपाल आणि यदुनाथ हे मित्र होते. या दोघांमध्ये समलिंगी संबंध निर्माण झाले होते. छत्रपाल याला यदुनाथ आवडत होता, मात्र शारीरिक आकर्षणापलिकडे जात त्याला या संबंधांद्वारे आर्थिक फायदाही करून घ्यायचा होता. छत्रपाल हा यदुनाथकडे सारखा हट्ट करत होता की मला तुझी बायको बनव. तो इतक्यावरच थांबला नाही, त्याने यदुनाथला सांगितले की बायको बनवल्यानंतर तुझं घर तू माझ्या नावावर कर. यदुनाथ या गोष्टीसाठी तयार नव्हता. यदुनाथने छत्रपालला स्पष्ट शब्दात नकार दिला होता.

यदुनाथ आपलं ऐकत नाही हे कळाल्याने छत्रपाल संतापला होता, त्याने त्याच्या प्रियकराकडे आपल्याला बायको बनवण्याचा आणि घर आपल्या नावावर कर असं म्हणत हट्ट धरला होता. यामुळे यदुनाथ भडकला आणि त्याने छत्रपालला गोळ्या घालून ठार मारलं. या प्रकरणात एकून 3 आरोपी असून पोलिसांनी यदुनाथ सिंह भदोरिया याला अटक केली आहे. त्याचे इतर दोन साथीदार अजून फरार आहेत.