11 कलाकार, एकच उद्दिष्ट; गेटवे ऑफ इंडिया येथे ज्ञानगंगा संगीत महोत्सव

एम फॉर सेवा ही चेन्नईत मुख्यालय असलेली आणि ग्रामीण भागातील शिक्षणावर लक्ष केंद्रित करणारी स्वयंसेवी संस्था आता महाराष्ट्रात आपले शैक्षणिक कार्यक्षेत्र विस्तारण्यास सज्ज झाली आहे. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून दोन दिवसांचा ज्ञानगंगा संगीत महोत्सव गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित करण्यात आला आहे. 14 आणि 15 जानेवारी रोजी ही संगीत मैफल रंगेल.

ज्ञानगंगा संगीत महोत्सवात शनिवारी सायंकाळी 5.30 वाजता आर्या आंबेकर, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे, पूजा गायतोंडे, अॅबी व्ही. आणि अंतरा नंदी यांचे गायन सादर होईल. रविवारी रंजनी-गायत्री यांचे डय़ुएट, जयतीर्थ मेवुंडी, कौशिकी चक्रवर्ती यांचे गायन सकाळी 6.30 वाजता आणि शंकर महादेवन यांचे गायन सायंकाळी 5.30 वाजता सादर होईल. मुंबईतील पंचम निषाद क्रिएटिव्हस ही संस्था या कार्यक्रमासाठी एम फॉर सेवाची इव्हेंट मॅनेजमेंट सहयोगी आहे.  गेल्या 22 वर्षांपासून एम फॉर सेवा ही संस्था ग्रामीण भागात  सक्षमीकरणाचे काम करत आहे. 15 राज्यांमध्ये त्यांचे 101 छात्रालये आहेत. छात्रालयम सुविधेचा लाभ दरवर्षी चार हजार विद्यार्थी घेतात. महाराष्ट्रात सध्या 11 छात्रालये आहेत.