क्लॅप बॉय बनला दिग्दर्शक! शशी खंदारेची ‘जिप्सी’ चित्रपटाद्वारे नवी इनिंग

आतापर्यंत 25हून अधिक चित्रपटांसाठी क्लॅप बॉय, सहाय्यक  दिग्दर्शक अशा विविध जवाबदाऱया निभावल्यानंतर शशी खंदारे दिग्दर्शक म्हणून  ‘जिप्सी’ या चित्रपटातून पदार्पण करत आहेत.

‘जिप्सी’ या चित्रपटाचं टिझर पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे सादर करण्यात आलं. यश सणस फिल्म्स या निर्मिती संस्थेद्वारे बोलपट क्रिएशन्सच्या सहयोगाने या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. चित्रपटाची कथा शशी खंदारे यांचीच आहे. पुढील महिन्यात कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा अशा तीन राज्यांत चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे. ‘जिप्सी’ या नावातून हा चित्रपट प्रवासावर आधारित असणार हे स्पष्ट आहे. पण टिझर पोस्टरमध्ये मोकळं आकाश दिसत असल्यानं चित्रपटाची कथा काय असेल याची उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटातील कलाकारांची नावे अजून गुलदस्त्यात आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या