टॉवेलमधील धोनी आणि हार्दिक पांड्याची ‘केक’ने आंघोळ

29

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानी खेळाडूंचे ड्रेसिंग रूममधील अनेक मजेशीर व्हिडिओ याआधी आपण पाहिले आहेत. मजा करण्याची एकही संधी खेळाडू गमावत नसल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी हार्दिक पांड्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हार्दिक पांड्याने स्वत:च हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये धोनी पांढरा टॉवेल गुंडाळून उभा असल्याचे दिसत आहे.

हा व्हिडिओ हार्दिक पांड्याच्या वाढदिवसाच्या दिवशी काढण्यात आला आहे. टेबलवर २-३ केक ठेवलेले दिसत आहेत. त्यानंतर हार्दिक पांड्या केक कट करतो आणि खेळाडू पांड्याला केकची आंघोळ घालतात. या व्हिडिओसोबत ‘वर्षांतून एकदाच येणारा वाढदिवस यापेक्षा गोड असूच शकत नाही! अशा भावना पांड्याने व्यक्त केल्या आहेत. ११ ऑक्टोबरला पांड्याने आपला २४वा वाढदिवस साजरा केला, त्याच दिवशी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर आणि फिजिओ पॅट्रिक फारहार्ट यांचाही वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यादिवशीचा हा व्हिडिओ आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी लाईक केले आहे, चला तर पाहूया हा हार्दिकची केक आंघोळ…

Everyone’s birthday comes once a year… revenge will be “sweet” #cakesmash #throwback #birthday #teamindia

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

आपली प्रतिक्रिया द्या