पुरावे न दिल्यास हाफीजला सोडून देऊ!

41

सामना ऑनलाईन, लाहोर

मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आणि दहशतवादी संघटना जमात-उद-दवाचा म्होरक्या हाफीज सईदच्या विरोधात पुरावे सादर केले नाहीत तर त्याला नजरकैदेतून सोडून देऊ असा इशारा लाहोर उच्च न्यायालयाने पाकिस्तान सरकारला दिला आहे.

हाफीज सईदच्या नजरकैदेला आव्हान देणारी याचिका लाहोर उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती सय्यद मझहर अली अकबर नक्वी यांच्यासमोर सुनावणी झाली.

आपली प्रतिक्रिया द्या