हाफिज सईदच्या मेव्हण्याला पाकिस्तानात अटक

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड व जमात उद दावाचा प्रमुख हाफीज सईद याचा मेव्हणा अब्दुर रेहमान मक्की याला पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. पाकिस्तान सरकारवर टीका केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.

मक्की हा जमात उद दवाचा राजकीय व आंतरराष्ट्रीय विंगचा व फलाह-ए- इन्सानियत या संस्थेचा प्रमुख आहे. दहशतवाद्यांची आर्थिक रसद बंद करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या विशेष कृती दलाने कारवाया सुरू केल्या आहेत. या कारवाईअंतर्गतच मक्कीला अटक करण्यात आल्याचे समजते.