गारपीटग्रस्त भागाची जिल्हाप्रमुख अंबेकर यांनी केली पाहणी

25

सामना प्रतिनिधी । जालना

आज जालना जिल्ह्यात वादळ-वारा व तुफानी गारपीट झाली. या गारपिटीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे द्राक्ष, भाजीपाला, फळे, ज्वारी, गहू व इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले. जालना तालुक्यातील वंजार उम्रद, गोदेगाव, वाघ्रुळ, इंदलकरवाडी व परिसरातील गावांना भेटी देऊन जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.

यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा परिषद सदस्य बबनराव खरात, सुधाकर खरात, प्रभाकर घडलिंग, सर्जेराव शेवाळे, रमेश वाघ, बबनराव जाधव, बबन काजळे आदी यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. गारपिटीने नुकसान झालेल्या रामचंद्र गायकवाड, लक्ष्मण गायकवाड, बाबुराव खरात, लक्ष्मण इंदलकर, अंबादास खरात, विठ्ठल इंदलकर आदी शेतकऱ्यांना आपले दु:ख शब्दांतून मांडणे अत्यंत कठीण झाले होते. या भावूक झालेल्या शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले होते. पोटच्या मुला-बाळाप्रमाणे जपलेले पीक डोळ्या देखत निसर्गाने क्षणात हिरावून घेतले. या शेतकऱ्यांना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी धीर देत त्यांना शासनाकडून योग्य ती नुकसानभरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

जालना तालुक्यातील वंजार उम्रद येथील गारांच्या माऱ्याने मृत पावलेले शेतकरी नामदेव शिंदे यांच्या कुटुंबीयांचे सात्वंन केले. तर जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर,ए.जे.बोराडे शिवसेनेच्या वतीने पदाधिकारी व शेतकऱ्यांसह जिल्हधिकाऱ्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणार असून, गारपिटीने झालेल्या नुकसानीकरिता बियाणे उत्पादन करणारे शेडनेट उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना ५ लाख रुपये, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना पाच लाख रुपये, बियाणे, भाजीपाला उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना एकरी दोन लाख तर गहू, ज्वारी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना एकरी ५० हजार या प्रमाणे मदत मिळावी याकरिता मागणी करणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी कडूबा इंदलकर, विठ्ठलराव खरात, दत्ता खलसे, गणेश खरात, संतोष खरात, राधाकिसन खरात, कुंडलिक खरात, सतीश केळकर, संजय वाघ, फकीरा शेख, सीताराम खरात, शाहू खंदारे, रामचंद्र वाघमारे, पंडित खरात, विठ्ठल इंदलकर, मधुकर खरात, प्रदुम्न वाघ, शिवाजी वाघ, गोरखनाथ पालवे, कमलाकर वाघ, सर्जेराव वाघ, विष्णू वाघ, मच्दिंद्र शिंदे, मच्छिंद्र वाहुळे, दादाराव लहाने, भगवान सहारे, गजानन सहारे, रावसाहेब सहारे, गजानन सहारे, नंदाभाऊ वाघ, भीमराव खरात यांच्यासह शेतकरी व मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या