लातूरमध्ये गारपीटीचा शेतकऱ्यांना फटका, वीज पडल्याने बैलजोडी ठार

18

सामना ऑनलाईन । लातूर

लातूरमध्ये रविवारी झालेल्या गारपीट, वादळ आणि पाऊस यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कुंटेफल, माटेफल आणि भिसेवाघोली व परीसरात वादळी वारे वीजांचा कडकडाटसह पाऊस झाला. मौजे बोरगाव येथे बाळासाहेब देशमुख यांच्या दोन बैलांचा वीज पडून मृत्यू झाला आहे.

लातूर तालुक्यासोबतच उदगीर तालूक्यातील वाढवणा परिसरातही गारपीट झाली. लातुरामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने भरपाई द्यावी अशी मागमी लातूर स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष नवनाथ शिंदे यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या