13 वर्षाच्या मुलीच्या पोटात सापडले अर्धा किलो केस आणि शॅम्पूचा पाऊच

871

तमिळनाडूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 13 वर्षाच्या मुलीच्या पोटात दुखत होते. तिला इस्पितळात दाखल केले असता तिच्या पोटातून अर्धा किलो केस आणि शॅम्पूचा पाऊच सापडला आहे. तिच्या पोटात जास्तच दुखल्यामुळे तिला इस्पितळात दाखल करण्यात आले होते.

तमिळनाडूच्या कोइबंतूर शहरात एक मुलगी 7 वीत शिकत होती. तिच्या नेहमी पोटात दुखत होते. एकदा तिच्या पोटात जास्तच दुखत होते. तेव्हा तिला डॉक्टरांकडे नेण्यात आले. प्राथमिक तपास केल्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेदरम्यान तिच्या पोटातून तब्बल अर्धा किलो केस आणी शॅम्पूचा एक रिकामा पाऊच काढण्यात आला. तिच्या पोटात एवढे केस आणि हा शॅम्पूचा पाऊच गेलाच कसा अशा प्रश्न डॉक्टरांना पडला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार मुलीचे जवळच्या व्यक्तीचे निधन झाले होते. त्यामुळे ती नैराश्यात होती. तिला जे मिळेल ती गिळून टाकायची. गेली अनेक दिवस ती असे काही ना काही गिळायची. तिने शॅम्पूचे रिमाके पाऊचही गिळाले होते. डॉक्टरांनी दीड तास शस्त्रक्रिया करून ते सगळे बाहेर काढले. आता तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या