पत्नी व सासरच्या जाचामुळे एचएएल कर्मचाऱ्याची आत्महत्या

30

सामना ऑनलाईन, नाशिक

निफाड तालुक्यातील ओझर येथे एचएएलमधील कर्मचाऱ्याने पत्नीसह तिच्या नातेवाईकांकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. याप्रकरणी अटक केलेल्या दोघांना न्यायालयाने १९ मेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

संतोष मच्छिंद्र पवार (३२) हा शनिवारी, १३ मे रोजी सकाळी एचएएल कॉलनीतील राहत्या घरी गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. याप्रकरणी ओझर पोलीस ठाण्यात भाऊ सचिन पवार यांच्या फिर्यादीवरून संतोषची पत्नी प्रियंका, सासरे विष्णू शिंदे, चुलत सासरे कृष्णा शिंदे व आप्पासाहेब बोरगुडे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्वजण ५ फेब्रुवारी २०१३ पासून संतोषला त्रास देत होते, याला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यातील संशयित कृष्णा शिंदे व बोरगुडे यांना शनिवारी अटक करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या