पनवेलजवळ कारागिरांचे अर्धा किलो सोने लुटून चोर फरार

33

सामना ऑनलाईन, पनवेल

पनवेलजवळ ४ चोरट्यांनी कारागिरांकडे असलेले अर्धा किलो सोने आणि ८८ हजार रूपये लुटून नेले. कामोठ्यातील सेक्टर -२५ जवळ ही घटना घडली आहे. या चोरट्यांनी चोरी करताना कारागिरांना मारहाण देखील केली आहे, ज्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

विशाल शेंडगे आणि गोरख शिंदे अशी जखमी झालेल्या कारागिरांची नावे आहेत. कामोठे वसाहतीमध्ये असलेल्या सोन्याची पेढीमधअये सोने गाळण्याचे ते काम करतात. हे दोघेजण अर्धा किलो सोनं आणि रोख रक्कम घेऊन पनवेलला सोनं तपासण्यासाठी निघाले होते. सेक्टर-२५ विटभट्टीजवळ अचानक त्यांच्या बाजूला मोटरसायकलवर बसलेले दोन जण आले आणि त्यांनी आम्हाला शिव्या का देतो असे बोलून भांडण सुरू केलं. त्याचवेळेस स्विफ्ट गाडीतून आणखी दोघेजण आले आणि त्यांनी या दोन कारागिरांना मारहाण करायला सुरूवात केली. मारहाण करत असतानाच यातल्या एकाने त्यांच्याजवळचं सोनं आणि पैसे घेतलं, यानंतर हे चौघेही जण फरार झाले. याबाबतची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात करताच पोलीस उपायुक्त माने, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नाईक आदींसह गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलीस या घटनेची सखोल चौकशी करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या