कोरोना लस बनवण्यासाठी 5 लाख शार्कचा बळी? वाचा काय आहे तज्ज्ञांचे मत

जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. जगभरात कोरोनावर लस शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. कोरोनावर लस बनवण्यासाठी 5 लाख शार्क  मारावे लागतील असे मत वन्य प्राणी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

शार्कच्या यकृतात एक नैसर्गिक तेल असतं. या तेलाचा उपयोग कोरोना लस बनवण्यासाठी होऊ शकतो. म्हणून कोरोना लस बनवण्यासाठी पाच लाख शार्क मारावे लागतील अशी भिती अमेरिकेतील शार्क अलाईज या संस्थेने व्यक्त केली आहे.

शार्कच्या यकृतात एक नैसर्गिक तेल असतं. त्याला शास्त्रीय भाषेत Squalene म्हणतात. या तेलामुळे कोरोना लस अजून प्रभावी होऊ शकते. हे नैसर्गिक तेल वापरून जर लस बनवली तर 5 लाख शार्कला मारून टाकावे लागेल अशी माहिती शार्क अलाईज या संस्थेने दिली आहे. कारण जगभरात कोरोनाच्या 30 लशींवर काम सुरू आहे. या लशीची चाचणी म्हणून स्वयंसेवकाला दोन वेळा लस दिली दिली जाते. जर संपूर्ण जगात कोरोनाची लस द्यावी लागली तर मोठ्या प्रमाणात शार्कची कत्तल करावी लागेल. तसेच शार्क माशाची पैदास होण्याचे प्रमाण कमी आहे, त्यामुळे शार्कची प्रजातीही नष्ट होऊ शकते अशी भितीही संस्थेने व्यक्त केली आहे.

आम्ही कोरोना लशीच्या विरोधात नाही असे संस्थेच्या संस्थापक स्टीफनी ब्रेन्डिल म्हणाल्या आहेत. पण एका प्राण्याला मारून लस बनवणे चुकीचे असल्याचे सांगितले. तसेच इतर कुठल्या प्राण्यांमध्ये Squalene आढळतं याचाही शोध घेतला पाहिजे असेही त्यांनी नमूद केले.

आपली प्रतिक्रिया द्या