जगातील निम्मी तरुणाई कोरोनामुळे ‘डिप्रेशन’मध्ये!

संपूर्ण जग ठप्प करणाऱया कोरोना महामारीने तरुणाईच्या आत्मविश्वासाकरही मोठा आघात केला आहे. जगातील जवळपास निम्म्या तरुणाईला कोरोनाने निराशेच्या गर्तेत लोटले आहे. तसेच एक तृतीयांशहून अधिक तरुणाईला आपले करिअर अंधकारमय झाल्याची चिंता सतावत आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने केलेल्या सर्वेक्षणात ही चिंतनीय बाब समोर आली आहे.

महामारीचा नोकरी, शिक्षण, हक्क तसेच मानसिक आरोग्यावर झालेला परिणाम जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. रोजगाराबाबत वेळीच सकारात्मक ठोस पावले उचलली गेली नाही, तर तरुणाईवर कोरोना महामारीचा दिर्घकालीन विपरीत परिणाम दिसणार आहे. कोरोना महामारीने मनुष्याच्या जीवनशैलीतील प्रत्येक घटकावर मोठा आघात केला आहे. महामारीचे संकट येण्यापूर्वी सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात तरुणाईपुढे आव्हाने होती. त्या आव्हानांनी कोरोना महामारीत भीषण रुप धारण केल्याचे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या सर्वेक्षणात म्हटले आहे. 112 देशांतील 18 ते 29 वर्ष वयोगटातील 12 हजारांहून अधिक जण या सर्वेक्षणात सहभागी होते.

आपली प्रतिक्रिया द्या