बारावी परीक्षेचे हॉलतिकीट उद्यापासून मिळणार

फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये होणाऱया बारावी परीक्षेचे हॉलतिकीट 27 जानेवारीपासून मिळणार आहे. ज्युनिअर कॉलेजना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर सकाळी 11 वाजल्यापासून कॉलेज लॉगीनमध्ये हॉलतिकीट डाऊनलोड करता येतील. विद्यार्थ्यांना डाऊनलोड केलेल्या हॉलतिकिटाचे प्रिंट द्यावयाचे आहे. त्यासाठी वेगळे शुल्क आकारू नये, अशा सूचनाही शिक्षण मंडळाने दिल्या आहेत. हॉलतिकिटामध्ये काही दुरुस्त्या असतील तर विद्यार्थ्यांनी विभागीय शिक्षण मंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य मंडळ सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.