झटपट तयार करा हलवा

सफरचंदाचा हलवा
साहित्य: ५ मध्यम आकाराचे सफरचंद, एक कप दूध, ३५ ग्रॅम खवा, २-३ चमचे साखर, १ चमचा वेलची पावडर, काजू-बदाम-पिस्ता

कृती:
१. सफरचंद चांगले किसून घ्या.
२. आतील बिया बाजूला काढून टाका.
३. एका खोलगट नॉन-स्टिक भांड्यात संफरचंदाचा किस घालून मंद आचेवर शिजवा.
४. संफरचंदातील पाणी पूर्णपणे सुकू द्या.
५. किस पूर्णतः मोकळा झाला की, त्यात एक कप दूध घाला.
६. किसामध्ये दूध पूर्ण शोषून घेईपर्यंत शिजवा.
७. वरून खवा आणि साखर घालून मध्यम आचेवर ब्राऊन होईपर्यंत परता.
८. वरून बारीक कापलेले काजू-बदाम-पिस्ता घाला.
९. त्यावर वेलची पूड घालून गरम किंवा थंड सफरचंद हलवा सर्व्ह करा.

केळीचा हलवा
साहित्य: १ कप बदाम पावडर, ३ पिकलेली केळी, २ चमचे तूप/बटर, साखर, वेलची पावडर

कृती:
१. बदाम पावडर मंद आचेवर हलक्या सोनेरी रंगात परतून घ्या.
२. त्यात तीन पिकलेली केळी कुस्करून घाला
३. वरून तूप/बटर घालून आच मोठी करून २-३ मिनिटे शिजवा.
४. जसे गोड हवे त्यानुसार साखर घाला.
५. वरून वेलची पूज घाला
६. मिश्रणाला तेल सुटायला लागले की, केळ्याचा हलवा तयार आहे समजा.
७. गरमगरम हलवा सर्व्ह करा.

आंब्याचा हलवा
साहित्य: ३ पिकलेले आंब्यांचा गर, अर्धा कप खवा, १ चमचा साखर, ४ चमचे कापलेले पिस्ता

कृती:
१. खोलगट पॅनमध्ये आंब्यांचा गर घालून ३-४ मिनिटे शिजवा
२. मिश्रण तळाला लागू नये म्हणून सतत हलवत राहा.
३. वरून खवा, साखर आणि कापलेले पिस्ता घालून परतून घ्या.
४. मिश्रण ब्राऊन होईपर्यंत शिजवा.
५. गरम किंवा थंड आंब्याचा हलवा सर्व्ह करा.

पेरूचा हलवा
साहित्य: अर्धा किलो साल काढलेले, बिया काढलेले आणि बारीक चिरलेले पेरू, २ चमचे तूप/बटर, कंडेन्स्ड दूध, ३० ग्रॅम खवा, आवडीचे ड्राय फ्रुट्स

कृती:
१. साल, बिया काढलेले आणि बारीक चिरलेले पेरू मिक्सरमध्ये फिरवून किंवा ब्लेंडरने बारीक करून त्याची प्युरी करून घ्या.
२. ही प्युरी आहे त्या प्रमाणापेक्षा पाव प्रमाण होईपर्यंत मंद आचेवर शिजवा.
३. वरून तूप/बटर घालून २-३ मिनिटे आणखी शिजवा.
४. त्यात कंडेन्स्ड दूध आणि खवा मिसळा.
५. ब्राऊन होईपर्यंत मोठ्या गॅसवर शिजवा.
६. वरून तुमच्या आवडीचे ड्राय फ्रुट्स घालून पेरुचा हलवा सर्व्ह करा.

ड्राय फ्रुट्स हलवा
साहित्य: १ कप बदाम, १ कप काजू, दूध,साखर, तूप, केसर

कृती:
१. रात्रभर काजू आणि बदाम पाण्यात भिजत ठेवा.
२. भिजलेल्या बदामाची साल हलकेच काढा.
३. बदाम आणि काजूची पेस्ट करून घ्या.
४. पातळ पेस्ट करण्यासाठी त्यात थोडे दूध घाला.
५. एका पसरट पॅनमध्ये हे मिश्रण घालून ते हलके सोनेरी होईपर्यंत शिजवा.
६. वरून साखर, तूप आणि १ चमचा दुधात भिजवलेले केसर घाला.
७. मिश्रण एकजीव होईपर्यंत परता.
८. गॅस बंद करून ते मिश्रण एका ताटावर पसरवून घ्या.
९. चौकोनी किंवा डायमंड आकारात कापून हलवा सर्व्ह करा.

आपली प्रतिक्रिया द्या